

फोंडा (गोवा) – वसंत पंचमी, म्हणजे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन ! अशा या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ पार पडला. हे होम ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, या उद्देशाने करण्यात आले. या होमांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पूर्णाहुती आणि आरती करून या होमाची सांगता करण्यात आली.