Go-Pratishtha Yagya : महाकुंभपर्वात ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’ला आरंभ !

गो-प्रतिष्ठा महायज्ञ

प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) – हिमालयातील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमर्वात ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’ला आरंभ झाला. यात श्रीगणेश याग करण्यात आला. गोहत्येमुळे भारतभूमीला लागलेला कलंक मिटवण्यासाठी, गोहत्येमुळे प्रत्येक हिंदूला लागलेल्या पापाचे क्षालन होण्यासाठी, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी, गोमातेचे संरक्षण करण्यासाठी आध्यात्मिक शक्ती मिळावी, यासाठी या गो प्रतिष्ठा महायज्ञाद्वारे देवतांना आहुती देण्यात येत आहे.