
नाशिक – ‘सिटीलिंक’ आस्थापनाची बस रस्त्यात बंद पडली. तेथे उभ्या असलेल्या प्रवाशांमधील महिलेचा ‘तुम्हाला कुठे जायचे ?’, अशी हिंदीतून विचारणा केली, अश्लील हावभाव केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी धर्मांध रिक्शाचालक मिजान रजा उपाख्य मल्ला सादिक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.
१. बोधलेनगर परिसरामध्ये ‘सिटीलिंक’च्या बंद पडलेल्या बसजवळ वासनांध रिक्शाचालकाने प्रवासी महिलेकडे येऊन अश्लील हावभाव करत आक्षेपार्ह वर्तन केले.
२. ही महिला दुसर्या ‘सिटीलिंक’च्या गाडीमध्ये बसली. धर्मांधाने त्या बसचा पाठलाग केला. ती बस ‘द्वारका सर्कल’ येथे आल्यानंतर धर्मांध रिक्शाचालकाने ‘सिटीलिंक’ गाडीसमोर रिक्शा आडवी घातली.
३. धर्मांधाने नग्न होऊन त्याच्या मित्राच्या साहाय्याने बसचालक आणि वाहक यांना मारहाण केली, तसेच बसवर दगडफेक करत तोडफोडसुद्धा केली. बसगाडीतील प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत धर्मांधांना अटक केली.
आरोपी धर्मांध हा गुन्हेगार !
रिक्शाचालक मिजान रजा हा भद्रकाली, जुने नाशिक या परिसरातील आहे. त्याच्यावर यापूर्वी १ दरोड्याचा गुन्हा नोंद आहे. १६ ऑगस्टला झालेल्या दंगलीतील तो आरोपी आहे. त्याला शहरातून तडीपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा दिली असती, तर धर्मांध पुढील गुन्हे करण्यास धजावला नसता ! – संपादक)