श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात राज्यभरातील भजनी मंडळांची भजन सेवा !

संग्रहित छायाचित्र

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथीनिमित्त १३ एप्रिलपासून भजन सेवा चालू झाली आहे. हे कार्यक्रम २५ एप्रिलपर्यंत असतील. प्रतिदिन दुपारी १२ ते ४ या वेळेत ज्योतिबा मंडपात पारंपरिक भजनी मंडळांची भजन सेवा आयोजित केली आहे. या भजन सेवेत अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर, वैराग, लातूर, पुणे, बारामती इत्यादी ठिकाणच्या भजनी मंडळांची भजन सेवा होणार आहे, तरी भजन सेवेचा आनंद लुटू इच्छिणार्‍या सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

—-

कार्यक्रमाची माहिती

कृष्णा बुवा माळकर, प्रशांत देशपांडे आणि सहकार्‍यांची भक्ती संगीतसेवा, आरती मुनिश्वर यांची प्रवचनसेवा, चि. सार्थक बावीकर यांची भक्ती संगीत सेवा, ह.भ.प. रत्नप्रभा सहस्रबुद्धे यांची कीर्तनसेवा, तमन्ना नायर-अश्विनी जोशी आणि सहकलाकारांचा कथ्थक, तसेच भरत नाट्यम् नृत्याविष्कार, ह.भ.प. कुलदीप साळुंके यांची प्रवचन सेवा, गौरी गंगाजळीवाले यांची भक्ती संगीत सेवा, ह.भ.प. स्वामी चरणाश्रीत गिरीमहाराज (महामंडलेश्वर) यांची प्रवचनसेवा, योगेश रामदास आणि सहकार्‍यांची भक्ती संगीत सेवा, निखील महामुनी अन् सहकलाकारांची भक्ती संगीत सेवा, वैष्णवी पवळे आणि केदार केळकर यांची भक्ती संगीत सेवा, ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांची कीर्तनसेवा, गौतमी चिपळूणकर यांची भक्ती संगीत सेवा, देविदास जोशी यांची प्रवचनसेवा, तर पंडित प्रसन्न गुडी आणि भार्गवी कुलकर्णी यांची भक्ती संगीत सेवा