श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) येथे धर्मांध अमीर शेख याच्याकडून मुलीचा विनयभंग !

‘अ‍ॅट्रॉसिटी’ आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक

प्रतिकात्मक चित्र

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – एका धर्मांधाने मुलीची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ‘ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करीन’, अशी धमकी देत मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार धर्मांध अमीर अजीज शेख याच्यावर ‘अ‍ॅट्रॉसिटी’सह ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.

१. पीडित मुलीच्या आईला ‘तुमची मुलगी प्रभाग क्र. ७ मधील ‘हॉटेल विजय’मध्ये एका मुलासोबत बसली आहे’, अशी माहिती काही जणांनी दिली.

२. हॉटेलमध्ये अमीर तेथे दिसला. मुलीसोबत छायाचित्रे काढून तिची बदनामी करत असल्याची तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार दिली होती. तेव्हा गावातील नातेवाइकांनी मध्यस्ती केली होती.

३. पीडित मुलीला विचारल्यानंतर तिने सांगितले की, अमीर याने मला बळजोरीने येथे आणले आहे. ‘जुनी छायाचित्रे प्रसारित करीन’, अशी धमकी देत आहे. त्याचा जाब अमीर याला विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

४. आरोपीचा भ्रमणभाष पडताळ्यानंतर त्यामध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आढळली.

संपादकीय भूमिका :

अशा वासनांधांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांना जरब बसणार नाही !