‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडियाग होता. त्या दिवशी चंडियागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण ४ नोव्हेंबर या दिवशी पाहिल्या. आज उर्वरित भाग पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/850909.html
३. सौ. मंजुला कपूर, देहली (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५६ वर्षे)
३ अ. यज्ञाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रत्यक्ष प्रक्षेपणाचे नियोजन साधिकेच्या घरी करण्यात येणे आणि त्या क्षणापासून तिच्या मनात आनंदाच्या लहरी उठणे : ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने १५.५.२०२३ या दिवशी यज्ञाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रत्यक्ष प्रक्षेपणाचे नियोजन आमच्या घरी करण्यात आले होते. ही सूचना मिळाल्या क्षणापासून माझ्या मनात आनंदाच्या लहरी उठत होत्या. मनात पुष्कळ उत्सुकता होती. गुरुदेवांचे कोणत्या मनोहर स्वरूपाचे दर्शन होईल ! प्रार्थना, कृतज्ञता आणि शरणागती यांमध्ये वाढ झाली होती.
३ आ. यज्ञात उपस्थित संत, सद्गुरु आणि तिन्ही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या) दर्शनामुळे शक्ती आणि चैतन्य प्राप्त होणे : ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने त्या दिवशी संपूर्ण वेळ तिन्ही मोक्षगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) चरणांच्या सान्निध्यात आहे’, असे मला वाटत होते. जेव्हा जेव्हा ‘गोविंदा गोविंदा’, असा नामजप व्हायचा. त्या वेळी बाहेरून कोकिळेच्या कुंजनाचा आवाज जोराने सतत ऐकू येत होता. श्री. हरीश कपूर (माझे यजमान) यांनाही संपूर्ण कालावधीत कसलीही अडचण आली नाही. यज्ञात उपस्थित सर्व साधक, संत, सद्गुरु आणि तिन्ही मोक्षगुरु यांच्या दर्शनामुळे शक्ती आणि चैतन्य प्राप्त होत होते. ते प्रत्येक क्षणी माझ्याकडून नामजप करून घेत होते. ‘गुरुदेवांच्या कृपेने फुले होऊन तिन्ही मोक्षगुरु, देवता यांच्या चरणी मी समर्पित होऊ शकत आहे’, असे मला प्रत्येक नामजप करतांना वाटत होते. संपूर्ण वेळ चोहीकडे एक सुगंध येत होता.’
४. सौ. तारा यादव, नोएडा
४ अ. ‘१४.५.२०२३ या दिवशी चंडियाग चालू असतांना कार्यक्रमस्थळी संपूर्ण वेळ हवनाचा सुगंध आला.’
४ आ. घरात काही प्रसंग झाल्याने मन पुष्कळ अस्थिर असणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना झाल्यावर मन हलके होणे अन् अंतर्मनापासून कृतज्ञता वाटणे : दोन दिवसांपासून माझे मन पुष्कळ अस्थिर होते. घरात काही प्रसंग झाले होते; परंतु जेव्हा मी कार्यक्रमस्थळी पोचले. तेव्हा वारंवार गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना होत होती. हे गुरुदेव, (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) ‘माझे स्वभावदोष आणि अहं या यज्ञकुंडात जळून नष्ट होऊ द्या. माझ्या मनात सर्वांप्रती प्रेमभाव टिकून राहू द्या. अन्यांचे स्वभावदोष पहाण्यापेक्षा मला सर्वांमध्ये तुमचेच रूप पहाता येऊदे. त्यानंतर माझे मन हलके झाले आणि पुनःपुन्हा गुरुदेवांच्या चरणांप्रती अंतर्मनातून कृतज्ञता वाटत होती. आतून आनंद जाणवत होता. ही अनुभूती दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
५. श्री. त्रिलोक माहुर, ग्रेटर नोएडा
५ अ. ‘यज्ञ समाप्तीच्या वेळी आरतीनंतर गुरुदेवांचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीचे चित्र यांच्याकडे पाहून मला असे वाटत होते, ‘ते दृश्य पडद्यावर नसून प्रत्यक्षात सजीव रूपात आमच्या समोर आहे.’ (समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक १९.१२.२०२३)