हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’मुळे वैचारिक बळ मिळते ! – संदीप शिंदे, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

देशात आणि जगात जेथे जेथे हिंदूंवर अन्याय होईल, आघात होतील, आक्रमणे होईल, अत्याचार होईल, त्यांचा ‘सनातन प्रभात’ आवाज बनेल. त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडेल, असे आश्वासक उद्गार त्यांनी काढले

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवरूपी आकाशगंगेतील एकमात्र सूर्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न हिंदुत्वनिष्ठाचे संघटन असलेल्या या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आकाशगंगेची उपमा देता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या आकाशगंगेला साधनेच्या ज्ञानाद्वारे प्रकाश देणारे एकमात्र स्वयंप्रकाशी सूर्य आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. असे ते म्हणाले

सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन होणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित आणि महात्मा यांनी सर्वधर्मसमभावाचे नॅरेटिव्ह (कथानक) भारतियांवर थोपवले. त्याने संपूर्ण हिंदु धर्माला घेरले. सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन झाले पाहिजे. असे उद्गार त्यांनी काढले

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्‍वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्‍यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्‍थान, छत्तीसगड

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रत्‍यक्ष कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. वेगवेगळ्‍या पद्धतीने काम केल्‍यामुळे हिंदूंची शक्‍ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्‍या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्‍यायला हवे….

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांची रामनाथी आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) पार पडले. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या सहाव्‍या दिवसाच्‍या सत्रातील मान्‍यवरांचे सूक्ष्म परीक्षण

पू. श्री रामबालक दासजी महात्‍यागी महाराज संत असूनही त्‍यांच्‍यात पुष्‍कळ कृतज्ञताभाव आहे. त्‍यांचा अहं अल्‍प असल्‍यामुळे ते स्‍वतःला ‘सेवक’ म्‍हणतात.
त्‍यांच्‍यात क्षात्रतेज आणि धर्मतेज कार्यरत आहे. या तेजाच्‍या बळावर कार्य करत असल्‍यामुळे ते हिंदूंवरील आक्रमणांना समर्थपणे प्रत्‍युत्तर देतात….

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या वेळी तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांच्‍या भाषणाचे केलेले सूक्ष्म परीक्षण

‘पूर्वीच्‍या तुलनेत श्री. टी. राजा सिंह लोध यांची स्‍थिरता वाढली आहे. ते शांत झाले आहेत.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’मध्‍ये अडचणी येऊ नयेत, यासाठी महोत्‍सवाच्‍या आधीच आरंभ केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय आणि त्‍यांची मिळालेली फलनिष्‍पत्ती

हिंदुत्‍वनिष्‍ठांचे आश्रमदर्शन आणि सत्‍संग निर्विघ्‍नपणे पार पडावे, यासाठी केलेला जप

‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’चे नाव ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ केलेले वाचून मनाची झालेली विचारप्रक्रिया !

वर्ष १९९० मध्‍ये सनातन संस्‍थेची स्‍थापना झाली. समाजाकडून साधना करून घेण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना आणि त्‍यामागील सिद्धांत अन् तत्त्वे जाहीर प्रवचनांतून सांगितली. त्‍यामुळे सहस्रो साधक साधना करू लागले.

नांदते इथेच धर्मराज्‍य सारेच अनुभवती ।

अधिवेशनाला आलेले साधक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ आश्रम पहाण्‍यासाठी येतात. कुणी भक्‍तीभावाने, कुणी जिज्ञासेने, कुणी कुतूहलाने, तर कुणी आपुलकीने सारे पहातात. ते समजून घेऊन अनुभूती घेतात. इथल्‍या चैतन्‍याने सारे भारावून जातात.