प.पू. डॉक्टरांचे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे (धर्मसंस्थापनेचे) अवतारी कार्य
(संकल्पना कळण्यासाठी दोन्ही चित्रांतील सूत्रे १,२,३,४…. या क्रमाने वाचा.)
१. वर्ष १९९० मध्ये सनातन संस्थेची स्थापना झाली. समाजाकडून साधना करून घेण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना आणि त्यामागील सिद्धांत अन् तत्त्वे जाहीर प्रवचनांतून सांगितली. त्यामुळे सहस्रो साधक साधना करू लागले.
२. वर्ष २००७ ते २०१५ या कालावधीत सहस्रो साधकांनी ६० टक्के अध्यात्मिक पातळी गाठली आणि सनातनचे १०० साधक संतपदी विराजमान झाले. ही प्रक्रिया पुढे चालू राहून अनेक संत सद़्गुरु पदावर आरूढ झाले. याच कालावधीत ५०० हून अधिक दैवी बालकांनी उच्च लोकातून पृथ्वीवर जन्म घेतला. सनातनच्या इतिहासातील ही एक अलौकिक घटना घडली.
३. ‘वरील घटनेचा सृष्टीवर काय परिणाम झाला ?’, हे वरील आकृतीत दिले आहे
४. पृथ्वीवरील रज, तम अल्प प्रमाणात न्यून झाल्यामुळे खंडित झालेले धर्माचे प्रक्षेपण चालू झाले आणि धर्माची पुनर्स्थापना होऊ लागली. हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केल्यामुळे महर्षि त्यांना विष्णूचा ‘अवतार’ म्हणतात. वर्ष २०२२ च्या अधिवेशनात वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे ध्येय होते.
५. हा धर्मसंस्थापनेचा पहिला टप्पा गाठण्यासाठी एका पिढीने आयुष्याची २५ वर्षे धर्मासाठी दिली आणि धर्माचे बीज रुजवले. आता पुढच्या पिढीने बीज अंकुरीत होऊन मोठा वृक्ष झाल्याचे पाहिले. त्यामुळे पृथ्वीवरील रज तमाचे आवरण अजून न्यून होत आहे. त्यानंतरची तिसरी पिढी वृक्षाला फळे आलेली पाहील. तेव्हा पृथ्वीवरील रज-तम पूर्ण नष्ट झालेले असेल आणि प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
६. वरील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईश्वर उच्च लोकातील अनेक दैवी जिवांना पृथ्वीवर पाठवेल किंबहुना पहिली आणि दुसरी पिढी गुरुकार्यासाठी पुन्हा जन्म घेईल. हे सर्व विश्वाच्या स्तरावर घडणार असल्यामुळे वर्ष २०२३ चे अधिवेशन ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ असावे.’
– कृतज्ञतापूर्वक श्री गुरुचरणी,
श्री. यशवंत कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)