हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’मुळे वैचारिक बळ मिळते ! – संदीप शिंदे, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह


रामनाथी, २३ जून (वार्ता.) –  दैनिक ‘सनातन प्रभात’ने या वर्षी रौप्यमहोत्सवी अर्थात २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’मुळे वैचारिक बळ मिळते. विविध हिंदु सणांच्या विरोधात नास्तिकतावाद्यांकडून धर्मद्रोही आवाहने केली जातात. त्या विरोधात ‘सनातन प्रभात’ केवळ वृत्त छापून थांबत नाही, तर त्यामागील धर्मशास्त्रीय दृष्टीकोनही छापते. परिणामी हिंदूंना धर्मशास्त्रीय भूमिका समजते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी प्रारंभीपासूनच सनातनच्या साधकांना शिकवले की, ‘सनातनचा प्रत्येक साधक पत्रकार आहे.’ त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणारा हिंदु राष्ट्रवीरही ‘सनातन प्रभात’चा पत्रकार आहे’, असे आम्ही समजतो.

देशात आणि जगात जेथे जेथे हिंदूंवर अन्याय होईल, आघात होतील, आक्रमणे होईल, अत्याचार होईल, त्यांचा ‘सनातन प्रभात’ आवाज बनेल. त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडेल,

संदीप शिंदे, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

असे आश्वासक उद्गार ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे सहसंपादक श्री. संदीप शिंदे यांनी काढले. ते १६ ते २२ जून या कालावधीत येथे पार पडलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उपस्थितांना संबोधित करत होते.