नांदते इथेच धर्मराज्‍य सारेच अनुभवती ।

अधिवेशनाला आलेले साधक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ आश्रम पहाण्‍यासाठी येतात. कुणी भक्‍तीभावाने, कुणी जिज्ञासेने, कुणी कुतूहलाने, तर कुणी आपुलकीने सारे पहातात. ते समजून घेऊन अनुभूती घेतात. इथल्‍या चैतन्‍याने सारे भारावून जातात. कुणी म्‍हणते, ‘इथे येऊन आम्‍ही माया विसरलो’, कुणी म्‍हणे, ‘माहेरी आल्‍यासारखे वाटते’, तर कुणी म्‍हणते, ‘आजोळी आल्‍यावर जे वात्‍सल्‍य पूर्वी अनुभवले होते, त्‍याचे स्‍मरण होते.’

सौ. स्‍वाती शिंदे

येती जन सारे आश्रम पहाण्‍यासाठी ।
पाठवणी करता चैतन्‍याची शिदोरी देऊन गाठी ॥ १ ॥

तिलक लावूनी शक्‍तीचा माथी ।
शोभती धर्मवीर सारे भूवैकुंठी रामनाथी ॥ २ ॥

नांदते इथेच धर्मराज्‍य सारेच अनुभवती ।
कारण दिशा देण्‍या असती श्रीगुरु सारथी ॥ ३ ॥

पार्थासम भक्‍ती वाढवूनी आता ।
चरणी विलीन करून घ्‍यावे गुरुनाथा ॥ ४ ॥

– सौ. स्‍वाती संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक