वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव १६ ते २२ जून या दिवशी रामनाथी, फोंडा येथील विद्याधिराज सभागृहात आयोजित करण्‍यात आले होते. अधिवेशनाच्‍या सहाव्‍या दिवशी, म्‍हणजे २१ जून या दिवशी महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी येथे देत आहोत.

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचे कार्य चालू ! – मनोहर सिंह घोडीवारा, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, राजस्थान

आम्ही धर्मासाठी सर्वकाही करायला सिद्ध आहोत, असे उद्गार त्यांनी काढले

तमिळनाडू आतंकवाद्यांचा कारखाना होत आहे ! – पाळा संतोष कुमार, संस्थापक अध्यक्ष,  हिंदू येलूच्ची पेरवाई, तमिळनाडू

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना खोट्या खटल्यांमध्ये गुंतवून अटक करण्यात येत आहे. धर्मकार्यावरील हे आघात आम्हाला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.विवेकानंद यांनी युवकांना जागरूक केले, त्याप्रमाणे संघटनेद्वारे युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य चालू आहे, असे उद्गार त्यांनी काढले

झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्वामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – हरिश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवा सेना, मध्यप्रदेश

आम्हीही गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात कार्य करतो.  हिंदुत्वाचे कार्य करत असल्याने माझ्यावर आणि माझ्या भावावर विरोधकांनी आक्रमणे केली; पण ईश्वराच्या कृपेने त्यातून आमचे रक्षण झाले. असे ते म्हणाले

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला सहकार्य करणार्‍यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार !

वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडण्यासाठी साहाय्य करणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात मान्यवरांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले. 

हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु आणि कार्यकर्ते यांचा कर्नाटक येथील अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांच्याकडून गौरव !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, समितीच्या आय्.टी. सेलचे समन्वयक श्री. प्रदीप वाडकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांचा गौरव केला.  

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला अनिवासी भारतीय व्यवहार कार्यालयाचे आयुक्त आणि माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांची उपस्थिती !

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून, तसेच श्रीकृष्णाचे चित्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

लव्ह जिहाद्याचे समर्थन करणार्‍या ‘सोनी टीव्ही’ला असा शिकवला धडा !

हिंदु धर्मावर आघात करणार्‍यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवल्याविना स्वस्थ बसू नका !’ – श्री. नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, देहली

मंदिरांमध्ये प्रवेश करतांना संस्कृतीनुसार वस्त्रे परिधान करायला हवीत ! – डिगंबर महाले, अध्यक्ष, श्री मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर (जिल्हा जळगाव)

वस्त्रसंहिता प्रथम मंगळग्रह मंदिरामध्ये लागू करण्यात आली. काही जणांनी विरोध केला; मात्र भाविकांनी वस्त्रसंहितेचे समर्थन केले. मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून येणार्‍यांना आम्ही नम्रपणे पूर्ण वस्त्रे देतो आणि तेच परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करतो. असे उद्गार त्यांनी काढले