प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न हिंदुत्वनिष्ठाचे संघटन असलेल्या या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला आकाशगंगेची उपमा देता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या आकाशगंगेला साधनेच्या ज्ञानाद्वारे प्रकाश देणारे एकमात्र स्वयंप्रकाशी सूर्य आहेत. मी त्यांच्या चरणी वंदन करतो.
येथे उपस्थित संतगण आणि सद्गुरु हे या आकाशगंगेमध्ये सप्तर्षींच्या रूपाने एका वेगळ्या स्थानी आहेत. ज्याप्रकारे तेजस्वी ध्रुवतारा अचल राहून अंधार्या रात्री दिशादर्शनाचे करतो, त्याप्रमाणे या अधिवेशनाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ हे संतगण या अधिवेशनाला आध्यात्मिक स्तरावर दिशादर्शन करत आहेत. चंद्राची शितलताही महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे विनम्र स्वभाव आणि चारित्र्यसंपन्न असलेले हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक आणि सनातनचे साधक या महोत्सवाच्या प्रारंभीपासून भोजन, वाहन, निवास या व्यवस्था करत आहेत. चित्रीकरणाच्या माध्यमातून हा महोत्सव सर्व विश्वापर्यंत पोचवत आहेत. या सर्वांचे आपण अभिनंदन करूया. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवात वेगवेगळ्या प्रांतांतून येणारे हिंदुत्वनिष्ठ या आकाशगंगेतील चमचमणारे तारे आहेत !- श्री. कमलेश कटारिया, अध्यक्ष, ‘संकल्प हिंदु राष्ट्र अभियान’, छत्रपती संभाजीनगर