१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव) पार पडले. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
अभिप्राय
श्री. स्वागत रघुवीर नाटेकर (गोरक्षक), इन्सुली, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.
‘आश्रम पाहून, तसेच साधक करत असलेल्या साधनेमुळे माझे मन प्रसन्न झाले.’ (१६.६.२०२३)
अधिवक्ता आशिष व्ही. वानखडे (अध्यक्ष, वकील संघ), दारव्हा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र.
‘आश्रम बघता बघता माझे मन ध्यानावस्थेत जात असल्याची अनुभूती मला आली.’ (१६.६.२०२३)
श्री. चिरण वीर प्रताप खड्का, प्रमुख, ॐ रक्षा वाहिनी, नेपाळ.
‘हा आश्रम आपल्या वैदिक सनातनी हिंदूंसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.’ (१५.६.२०२३)
सौ. जयश्री स. जैस्वाल, श्री संतोषीमाता मंदिर, किनवट, नांदेड, महाराष्ट्र. आश्रम पाहून पुष्कळ समाधान वाटले !
‘येणार्या पिढीला साधना आणि संस्कार यांची नितांत आवश्यकता आहे. हे कार्य पुष्कळ विशाल आहे. कार्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’ (१५.६.२०२३)
श्री. हरीश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवासेना, मध्यप्रदेश.
आश्रम पाहिल्यावर स्वर्गाचेच स्मरण झाले !
‘आश्रमात आल्यावर जे काही मी पाहिले, ते पाहून मला स्वर्गाचेच स्मरण झाले.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चालू असलेले हे कार्य पुष्कळ मोठे आहे. ‘या आश्रमात निःस्वार्थी भावाने चालू असलेले सेवाकार्य आणखी वृद्धिंगत होवो’, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.’ (१५.६.२०२३)
श्री. उमाकांत विश्वनाथ रानडे (सचिव, चित्पावन ब्राह्मण संघ), नागपूर, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमाची वास्तू अतिशय भव्य आणि दिव्य आहे.
आ. आश्रमात मला सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जाणवली.
इ. आश्रमातील स्वच्छता, तसेच साधकांची नम्रता आणि समजावण्याची शैली निश्चितच अभिनंदनीय आहे.’ (१५.६.२०२३)