१. पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज
अ. पू. श्री रामबालक दासजी महात्यागी महाराज संत असूनही त्यांच्यात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यांचा अहं अल्प असल्यामुळे ते स्वतःला ‘सेवक’ म्हणतात.
आ. त्यांच्यात क्षात्रतेज आणि धर्मतेज कार्यरत आहे. या तेजाच्या बळावर कार्य करत असल्यामुळे ते हिंदूंवरील आक्रमणांना समर्थपणे प्रत्युत्तर देतात आणि हिंदूंना धर्मसेवेत सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळ्या अन् प्रभावी उपाययोजना काढतात.
२. श्री. दुर्गेश परुळकर
अ. श्री. दुर्गेश परुळकर यांच्या साधनेमुळे त्यांच्यातील सात्त्विकतेत वाढ झाली आहे. त्यामुळे ते करत असलेल्या भाषणाचा परिणाम सर्व श्रोत्यांच्या थेट अंतर्मनावर होत होता.
आ. त्यांनी अत्यंत सोप्या; परंतु परखड भाषेमध्ये ‘औरंगाबाद’ या शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’, असे होऊ नये’, यासाठी हिंदूविरोधी लोकांनी केलेल्या षड्यंत्राची वस्तूस्थिती अत्यंत प्रभावीपणे मांडली.
३. श्री. ऋषी वशिष्ठ
अ. श्री. ऋषी वशिष्ठ यांची बुद्धी सात्त्विक आहे. त्यामुळे ते बुद्धीवंत, दूरदर्शी, प्रतिभाशाली अर्थतज्ञ आणि विचारवंत आहेत.
आ. त्यांच्यात राष्ट्ररक्षणासाठी संघर्ष करण्याची तळमळ आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा परिणाम उपस्थित श्रोत्यांच्या बुद्धीवर होऊन श्रोत्यांचे त्याविषयी चिंतन चालू झाले.
४. श्री. रवींद्र प्रभुदेसाई
अ. श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्यात ‘त्याग’ आणि ‘दायित्व घेणे’, हे गुण प्रधान आहेत. त्यामुळे व्यवसाय करतांनाही त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना होत आहे.
आ. त्यांच्या अध्यात्मप्रसार करण्याच्या तळमळीमुळे ते भाषण करत असतांना उपस्थित सर्व श्रोत्यांच्या मनात उत्साह निर्माण होत होता आणि त्यांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबले.
इ. ते भगवंताचे नाम घेत कार्य करत असल्यामुळे त्यांचे कर्मही साधना झाले आहे. यातून त्यांच्यावर भगवंताची कृपा होत आहे.
५. एस्थर धनराज
अ. एस्थर धनराज यांच्यात धर्मनिष्ठा आणि अभ्यासू वृत्ती आहे. त्यामुळे त्यांना अंतर्प्रेरणेने धर्मजागृतीच्या संदर्भात विचार सुचतात. त्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि आदर्श हिंदु धर्मप्रसारक आहेत.
आ. त्या धर्माभिमानी असून त्यांच्यात धर्मकार्य करण्याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. त्या ठामपणाने आणि सत्यनिष्ठेने त्यांचा विषय मांडत असल्यामुळे श्रोत्यांचे मन एकाग्र होत होते.
– श्री. राम होनप, कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), रामनाथी, गोवा. (२१.६.२०२३)
|