पाकने मलेशियामध्ये जप्त केलेल्या विमानाच्या भाड्याची ५१ कोटी रुपये रक्कम फेडली !

मलेशियाने पाकच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स’चे बोईंग ७७७ हे विमान काही दिवसांपूर्वी भाड्याची रक्कम न दिल्याने जप्त केले होते. आता पाकने लंडन उच्च न्यायालयात, ‘आयरिश जेट आस्थापनाला ५१ कोटी रुपये दिले आहेत’, असे सांगितले.

आनेवाडी पथकर नाका हस्तांतरण प्रकरणात खा. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता

पथकर नाक्यावर जमावबंदीचे आदेश असतांनाही खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जमाव केल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी खा. उदयनराजे यांच्यासह ११ कार्यकर्त्यांची वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

विवाहित महिलेसमवेत रहाणे ‘लिव्ह इन’ नाही, तर व्यभिचाराचा गुन्हा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या माजी महिला न्यायमूर्तींनी राज्यपालपद मिळण्यासाठी ८ कोटी ८० लाख रुपयांची लाच दिली !

निवृत्त न्यायाधिश राज्यपालपद मिळण्यासाठी लाच दिल्याचे स्वतःच सांगत असतील तर ‘त्यांच्या कार्यकाळात कशा प्रकारे न्यायनिवाडा दिला असेल ?

अधिकार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण माजी आमदार राजू तोडसाम यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा

कार्यालयातील लेखापालास शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने माजी आमदार राजू तोडसाम यांना शिक्षा सुनावली

आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांची न्यायालयीन चौकशी करावी !

आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ‘साखळी उपोषण’ चालू आहे.

दिग्दर्शक अली जफर यांसह ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून संमत

‘तांडव’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद झाला असून पुढील कारवाईसाठी लखनौ येथून पोलीस मुंबईत आले आहेत.

कर्नाटक सरकारने घातलेली गोहत्याबंदी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून वैध घोषित

गोहत्याबंदीला विरोध करणारी काँग्रेस आणि पुरो(अधो)गामी यांना चपराक !

ठाणे येथे एम्.डी. पावडरची तस्करी करणार्‍या धर्मांध महिलेसह तिघांना अटक

समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्‍या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच !

केवळ क्षमा नाही, तर सर्वांना कारागृहात टाकणार ! – आमदार राम कदम, भाजप

‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.