अधिकार्यांना कस्पटासमान वागणूक देऊन त्यांच्यावर अधिकार गाजवणारे लोकप्रतिनिधी !
यवतमाळ, २२ जानेवारी (वार्ता.) – यवतमाळ आर्णी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना ३ मास कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली. २०१३ या वर्षी पांढरकवडा महावितरण कार्यालयातील लेखापालास शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून २०१५ या वर्षी कनिष्ठ न्यायालयाने ३ मासाचा कारावास, १० सहस्र रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ मासाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला राजू तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर २१ जानेवारी २०२१ ला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.