सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – येथील आनेवाडी पथकर नाका हस्तांतरणावरून खा. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वर्ष २०१७ मध्ये मोठा संघर्ष पेटला होता. यानंतर दोन्ही राजे आणि त्यांचे समर्थक यांमध्ये मारहाण झाली होती. त्या कालावधीमध्ये पथकर नाक्यावर जमावबंदीचे आदेश असतांनाही खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जमाव केल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. २२ जानेवारी या दिवशी या प्रकरणाची सुनावणी वाई न्यायालयात चालू होती. या प्रकरणी खा. उदयनराजे यांच्यासह ११ कार्यकर्त्यांची वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.