ठाणे येथे एम्.डी. पावडरची तस्करी करणार्‍या धर्मांध महिलेसह तिघांना अटक

धर्मांध महिलाही अमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात !

ठाणे – नशायुक्त पदार्थाची (एम्.डी. पावडर) तस्करी करणार्‍या गुजरात येथील आदिल नजीरभाई शेख (वय २४ वर्षे), ओसामा मोहम्मद हुसेन भाभा (वय १९ वर्षे) या दोन व्यक्तीसह मुंबई येथील महिला बनोबर शफिक खोटाळ (वय ३१ वर्षे) अशा तिघांना गुन्हे अन्वेषण शाखेने राबोडी परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर सापळा रचून अटक केली आहे. (समाजाला नशेच्या आहारी ढकलणार्‍या धर्मांधांना कायद्याचे भय नाहीच ! – संपादक)

न्यायालयाने तिघांनाही २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीची ९० ग्रॅम एम्.डी. पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.