हिदूंसाठी शिवप्रतापदिन म्हणजे दसरा-दिवाळी यांसारखाच सण ! – मोहन शेटे, संस्थापक अध्यक्ष, इतिहासप्रेमी मंडळ

संपूर्ण विश्‍वात गाजलेल्या युद्धांपैकी एक अफझलखान वध, हे महाराजांच्या युद्धनीतीचे वैशिष्ट्य आणि शौर्याचा आदर्श आहे. आज अफझलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचे छायाचित्र लावण्यास विरोध केला जातो.

हिंदु धर्म अणि मंदिरे यांच्या रक्षणार्थ विदर्भस्तरीय मंदिर विश्‍वस्तांची ऑनलाईन बैठक

या बैठकीत नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. प्रत्येक मंदिरामध्ये सात्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, धर्मशिक्षण फलक लावावेत, सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यांवर सर्वांची सहमती झाली.

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती

अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात, असेच हिंदूंना वाटते !

छत्तीसगड येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धामाला (जिल्हा बालोद) संपूर्णपणे संरक्षण मिळावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राज्यपालांना निवेदन

राज्यपाल उइके यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शिष्टमंडळाला या धामाचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

(म्हणे) ‘पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ?’

व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !

अंनिसच्या आर्थिक व्यवहारांवरून दाभोलकर कुटुंबीय आणि अंनिसचे पदाधिकारी यांच्यामध्ये दुफळी

अंनिस या संघटनेच्या न्यासावर आर्थिक अपहार झाल्याचे दाखले यापूर्वी हिंदु विधीज्ञ परिषदेने अनेकवेळा पुराव्यानिशी दिले आहेत आणि आता तर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हेच याविषयी उघड करत आहेत. यातून डॉ. दाभोलकर यांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे !

प्रतिदिन ३ सहस्र भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळणार ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती