‘महाराष्ट्र प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन केले आहे. केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ? गर्दी तेथेही होणारच आहे, तर केवळ वहात्या पाण्यातील विसर्जनावर निर्बंध का ?’
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.