हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’ला जागृत होऊन विरोध करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

डोंगरगड (छत्तीसगड) येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक !

डोंगरगड (छत्तीसगड), ६ नोव्हेंबर (वार्ता.) – हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. विशिष्ट धर्माच्या नावावर समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. यातून देशासमोर मोठे आर्थिक आणि सामाजिक संकट उभे रहात आहे. समस्त हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. हनी गुप्ता यांनी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. घनवट बोलत होते. ‘हिंदु राष्ट्राच्या कार्यात सर्वांनी तन, मन, धन यांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थितांना केले.

श्री. सुनील घनवट

या बैठकीला गोरक्षक श्री. अग्रवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, श्री हनुमान भक्त युवा समिती, डोंगरगढ इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला काही हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. श्री. अग्रवाल यांनी ‘ईश्वराच्या कृपेने राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी आवश्यक ते साहाय्य करू’, असे सांगून सर्वांना आश्वस्त केले.