वाघजाई मंदिर आणि विशाळगडावरील अन्य मंदिरांचा जिर्णाद्धार यांसाठी मुंबई येथे पर्यटन खाते अन् पुरातत्व खाते यांची एक संयुक्त बैठक आयोजित करू ! – आमदार विनय कोरे यांचे आश्वासन

वाघजाई मंदिर आणि विशाळगडावरील अन्य मंदिरांचा जिर्णाद्धार यांसाठी मुंबई येथे पर्यटन खाते अन् पुरातत्व खाते यांची एक संयुक्त बैठक आयोजित करू ! – आमदार विनय कोरे यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्वासन

डावीकडून श्री. मनोज खाडये, आमदार श्री. विनय कोरे, श्री. सुनील घनवट, श्री. बाबासाहेब भोपळे आणि त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे

वारणानगर (जिल्हा कोल्हापूर), १९ सप्टेंबर (वार्ता.) – विशाळगडचा इतिहास सर्वांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करू. ठिकठिकाणी फलक लावणे, तसेच यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे साहाय्य घेऊ. या संदर्भात काहीतरी करायला हवे, असा विचार माझ्याही मनात चालू होता. वाघजाई मंदिर आणि गडावरील अन्य मंदिरांचा जिर्णाद्धार यांसाठी मुंबई येथे पर्यटन खाते अन् पुरातत्व खाते यांची एक संयुक्त बैठक आयोजित करू, असे आश्वासन पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातील आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री. विनय कोरे यांनी दिले. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी श्री. कोरे यांना या संदर्भात अवगत करून निवेदन सादर केले. त्या वेळी हे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे कोकण, तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ मानसिंग शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.