हिंदु जनजागृती समिती आणि ‘डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार’ यांच्या वतीने विठ्ठलभक्तांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावर जेजुरी येथे हिंदु जनजागृती समिती आणि ‘डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार’ यांच्या वतीने विठ्ठलभक्तांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली. या वेळी भाविकांना विनामूल्य शेंगदाणा चटणीच्या पाकिटांचेही वाटप करण्यात आले.