आधुनिक वैद्य सचिन साळुंखे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला सातारा शहरातील व्यापार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सातारा – भारतामध्ये ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) ही उत्पादनांना प्रमाणित करणारी आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र व्यवस्था असतांना वेगळ्या हलाल प्रमाणपत्राची (‘सर्टिफिकेशन’ची) आवश्यकताच काय ? धर्मांधांकडून सध्या लव्ह जिहादच्या जोडीला ‘हलाल सर्टिफिकेशन’च्या माध्यमातून देशात समांतर ‘हलाल अर्थव्यवस्था’ निर्माण केली जात आहे. हे देशासाठी घातक षड्यंत्र आहे. त्यामुळे सातारा येथील व्यापार्यांनी वेळीच जागृत होऊन ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. सातारा येथील आधुनिक वैद्य (डॉ.) सचिन साळुंखे यांच्या विशेष प्रयत्नांतून त्यांनी स्वतःच्या घरी शहरातील व्यापार्यांसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी श्री. घनवट बोलत होते. या प्रसंगी सातारा शहरातील प्रथितयश व्यापारी श्री. मोघे यांच्यासह शहरातील अनेक व्यापारी बैठकीस उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी भाजपचे नगरसेवक विजयकुमार काटवटे यांनी उपस्थित व्यापार्यांना श्री. सुनील घनवट यांची ओळख करून दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर आभारप्रदर्शन समितीचे श्री. राजेंद्र सांभारे यांनी केले.
श्री. घनवट पुढे म्हणाले की,
१. धर्मांधांकडून प्रत्येक वस्तू ‘हलाल’ प्रमाणित असल्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे उत्पादनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक होऊन बसले आहे.
२. ‘हलाल’ उत्पादनांना धर्माचा आधार असूनही मोठ्या चतुराईने निधर्मी असलेल्या भारत देशात हे प्रमाणपत्र लागू करण्यात आले आहे. आता हे प्रमाणपत्र केवळ मांसाहाराशी संबंधित न रहाता विविध खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहनिर्माण संस्थांशी संबंधित आस्थापने आणि मॉल या ठिकाणीही मागितली जात आहेत.
३. ‘हलाल’ उत्पादनांमुळे भविष्यात स्थानिक व्यापारी, पारंपरिक उद्योग आणि राष्ट्र यांवर कोणते संकट ओढवू शकते, याचा विचार सूज्ञ व्यापार्यांकडून झाला पाहिजे.
४. भारताचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि ‘हलाल सर्टिफिकेशन’ला विरोध करण्यासाठी व्यापार्यांनी संघटित व्हावे.
सातारा शहरातील व्यापारी श्री. मोघे यांची वैशिष्ट्यपूर्ण आणि अभिनंदनीय कृती !व्यापार्यांसह झालेल्या बैठकीतून प्रेरणा घेऊन शहरातील प्रथितयश व्यापारी श्री. मोघे यांनी दुसर्याच दिवशी नटराज मंदिर, सातारा येथे काही व्यापार्यांना एकत्र करून श्री. घनवट यांची भेट घालून दिली. या वेळी श्री. घनवट यांनी व्यापार्यांना ‘हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय ? आणि त्याचे दुष्परिणाम’, याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. मोघे यांनी श्री. घनवट यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी श्री. मोघे म्हणाले, ‘‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी अशा बैठका होणे आवश्यक आहे. मी माझ्या आयुष्यात अशी बैठक कधी पाहिली नाही.’’ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपस्थित व्यापार्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. |