चिंचवडमधील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल विरोधात पालकांचा फलकाद्वारे निषेध !

पालकांनी केवळ निषेध नोंदवून न थांबता मनमानी कारभार करणार्‍या शाळा प्रशासनाला चूक दुरुस्त करायला लावणे अपेक्षित आहे.

मत देता म्हणजे तुम्ही नेत्यांना विकत घेत नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यापार्‍यांना फटकारले

तुम्ही मते देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा शब्दांत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यापार्‍यांना फटकारले. येथील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.

(म्हणे) ‘तालिबानी पुरस्कार देऊन शिर्डी संस्थानचा सत्कार करू !’

३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाही, तर आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. त्या वेळी आम्ही शिर्डी संस्थानला ‘तालिबानी पुरस्कार’ देऊन सत्कार करू आणि त्यांच्या निर्णयाचा निषेध करू, अशी वल्गना तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा अर्जामध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखामध्ये ‘हिंदु’ धर्माचा पर्यायच नाही

हिंदु धर्माचा उल्लेख करून त्यामध्ये अन्य कुणाला समभाग अपेक्षित आहे, याची टीपही अर्जात देता आली असती. तसे न करता बहुसंख्य हिंदु धर्माला डावलून त्याऐवजी ‘नॉन मायनॉरिटी’ असा हेतुपुरस्सर उल्लेख करणाऱ्यांचा हिंदुद्वेष यातून उघड होत आहे.

धुळे येथे पोलिसांनी धर्मांधांकडून ३१ तलवारी कह्यात घेतल्या : दोघांना अटक

तलवारींचा साठा मालेगावातून आणल्याचे उघड – या प्रकरणाचा मालेगावशीही संबंध येत असल्याने पोलिसांनी वरवरची कारवाई न करता याची पाळेमुळे खोदून धर्मांधांविरोधात कठोरात कठोर कारवाई करायला हवी !

धर्मांधांकडून खारघर येथील गोशाळेतील गायींची दुसर्‍यांदा चोरी

पहिल्या चोरीच्या प्रकरणात कर्तव्यचुकार पोलिसांनी कारवाई न केल्याचा परिणाम !

राज्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्‍चित

आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी १०० जणांना लस दिली जाईल.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जोपर्यंत न्यायालय मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासनाला नोकर भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेश यांमध्ये आरक्षण लागू करता येणार नाही.

हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करा ! – शिवसेनेचे मुरुगुड पोलीस ठाण्यात निवेदन

प्रतिवर्षी होणार्‍या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

‘पी.एफ्.आय.’वर बंदीसाठी गोव्यात ‘श्री परशुराम गोमंतक सेने’चे १६ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन

या संघटनेवर गोव्यात बंद घालण्याची मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ३ मासांपूर्वी केली होती; मात्र या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधात आताच कारवाई न झाल्यास गोव्याचा पश्‍चिम बंगाल किंवा बिहार व्हायला वेळ लागणार नाही-श्री. शैलेंद्र वेलींगकर