हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करा ! – शिवसेनेचे मुरुगुड पोलीस ठाण्यात निवेदन

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन याकडे लक्ष का देत नाही ?

मुरगुड पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना निवेदन देतांना संभाजीराव भोकरे (भगवा सदरा घातलेले) आणि अन्य शिवसैनिक

कागल (जिल्हा कोल्हापूर), १० डिसेंबर (वार्ता.) – कागल तालुक्यात ४ साखर कारखाने कार्यरत असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू झाल्याने रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावणे, ओव्हरलोड, तसेच वेगमर्यादा, रिफ्लेक्टर, नेमप्लेट नसणे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. ट्रॅक्टर भरधाव वेगाने ऊस वाहतूक करत आहेत. त्यामुळे नेहमीच रस्त्यावर अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागत आहे. प्रतिवर्षी होणार्‍या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी मुरुगुड पोलीस ठाण्यात दिले आहे. या वेळी अन्य शिवसैनिक उपस्थित होते.