जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !

‘रश्मी बर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र काढले होते; पण त्यासाठी त्यांनी वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केले आहे,’ असा त्यांच्यावर आरोप आहे.

अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘अमरावती येथून ४ एप्रिल या दिवशी नवनीत राणा यांचे आवेदन प्रविष्ट करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील’, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश

वैद्यकीय क्षेत्रातील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !

आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित होण्यापूर्वीच गायकवाड यांनी आवेदन प्रविष्ट केल्याने त्यांनी बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर २ महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश !

न्यायाधीश शैलेश पी. ब्राह्मे आणि मंगेश एस्. पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या राज्य गुन्हे अन्वेषणाच्या (‘सीआयडी’च्या) चौकशी प्रकरणात ८ आठवडे म्हणजेच २ महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

घणसोली (नवी मुंबई) येथील अनधिकृत इमारत पुन्हा पाडणार !

घणसोली येथील ‘ओम साई अपार्टमेन्ट’ ही ४ मजली अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आणि सिडकोला दिले. ‘बेकायदा बांधकाम नियमित करण्यास अनुमती देता येणार नाही’, तसेच ‘बेकायदेशीर आणि अनियमितता यांत भेद आहे’, असे मुंबई  उच्च न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

संसदेच्या कायद्याची कार्यवाही करायची नसेल, तर कायदा करता कशाला ?

अपंगांच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन केलेले राज्य सल्लागार मंडळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ कार्यरत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने २७ मार्च या दिवशी राज्य सरकारला धारेवर धरले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘शिवसृष्टी’तून सर्वांना समजेल ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक !

भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृतीसह ठोस उपाय काढणे आवश्यक !

 ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले,”‘व्हीलचेअर’ची किती उपलब्धता आहे, मागणी किती आहे. याविषयी आढावा घेवून, त्या बाबतची सद्य:स्थिती कळवावी.