Kerala IAS Suspended : ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदु अधिकारी’ असा व्हॉट्सअ‍ॅप गट बनवल्यावरून केरळमध्ये आय.ए.एस्. अधिकारी निलंबित

(आय.ए.एस्. म्हणजे इंडियन अ‍ॅडमिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस – भारतीय प्रशाकीय सेवा)

कृषी विकास विभागाचे विशेष सचिव एन्. प्रशांत व वाणिज्य विभागाचे संचालक के. गोपाळकृष्णन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – व्हॉट्सअ‍ॅपवर ‘मल्लू हिंदू अधिकारी’ असा एक गट (ग्रुप) सिद्ध करून त्यात इतर अधिकार्‍यांना सहभागी करून घेतल्याच्या प्रकरणी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने  केरळ उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक के. गोपाळकृष्णन् यांना निलंबित केले आहे. तसेच राज्याचे अतिरिक्त सचिव ए. जयतिलक यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत वादग्रस्त पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी कृषी विकास विभागाचे विशेष सचिव एन्. प्रशांत यांनाही निलंबित करण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, धर्माच्या आधारावर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांमध्ये विभाजन निर्माण करणे आणि त्यांच्यात भिंत उभी करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. धर्माच्या आधारावर अधिकार्‍यांना वेगळे करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून झालेला दिसत आहे.

गोपाळकृष्णन वर्ष २०१३ च्या तुकडीतील (बॅचमधील) अधिकारी आहेत, तर एन्. प्रशांत वर्ष २०१७ च्या तुकडीतील (बॅचमधील) अधिकारी आहेत.

या कारवाईच्या आदल्या दिवशी महसूलमंत्री के. राजन यांनी सांगितले होते की, अधिकार्‍यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा सरकार देणार नाही. त्यांनी नियम आणि प्रक्रिया यांच्या अधीन राहून काम केले पाहिजे.

काय आहे गट ?

‘मल्लू हिंदू अधिकारी’ हा गट (ग्रुप) ३० ऑक्टोबर या दिवशी सिद्ध करण्यात आला होता. या गटामध्ये हिंदू आय.ए.एस्. (इंडियन अ‍ॅडमिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस – भारतीय प्रशाकीय सेवा) अधिकार्‍यांचा सहभाग होता. हा गट बनवल्यानंतर अनेक अधिकार्‍यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर काही घंट्यांतच हा गट रहित (डिलीट) करण्यात आला. दुसर्‍याच दिवशी गोपाळकृष्णन् यांनी पोलिसांत तक्रार नोंदवून करून त्यांचा भ्रमणभाष ‘हॅक’ (नियंत्रण मिळवल्याचे) झाल्याचे सांगितले. भ्रमणभाष हॅक झाल्यानंतर त्यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘मल्लू हिंदु अधिकारी’ आणि ‘मल्लू मुस्लिम अधिकारी’ असे गट सिद्ध करण्यात आले.

या आरोपाविषयी पोलिसांनी सांगितले की, भ्रमणभाष हॅक होण्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

संपादकीय भूमिका

केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी आघाडी सरकारला जळी-स्थळी हिंदू दिसत असल्यानेच ती अशा प्रकारची कारवाई करत आहे !