‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चे समालोचन मराठीतून होणार ! – अमेय खोपकर, मनसे

मुंबई : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चे समालोचन मराठीतून होणार आहे. मी आश्वासन नाही, तर धमकी द्यायला आलो होतो. ‘हॉटस्टार’च्या काचाही पुष्कळ महाग आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषा वापरली जावी, यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असेल, तर ती शोकांतिका आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आम्हाला भांडावे लागते, असे वक्तव्य मनसे नेते अमेय खोपकर यांनी केले. ‘हॉटस्टार’ या ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’च्या कार्यालयात खोपकर यांनी अनेक मनसे कार्यकर्त्यांसह आंदोलन करत ही चेतावणी दिली.
‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-२० सामन्याचं समालोचन हरयाणवी आणि भोजपुरी भाषेतूनही केलं जात आहे, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच… pic.twitter.com/tmVmtR9EiA
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2025
‘हॉटस्टार’वर अनेक भारतीय भाषांत क्रिकेटचे समालोचन होते; परंतु मराठीत होत नाही. लाखो प्रेक्षक ‘हॉटस्टार’वर क्रिकेट पहातात. त्यामुळे ‘हॉटस्टार’वर मराठी भाषेतूनही क्रिकेटचे समालोचन व्हावे, अशी मागणी मनसेने केली. ‘यापुढे ‘हॉटस्टार’वर मराठीतून क्रिकेटचे समालोचन होईल’, असे आश्वासन ‘हॉटस्टार’ने दिले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ होणार आहे.
या वेळी खोपकर म्हणाले,
‘‘येथे आल्यानंतर ‘हॉटस्टार’वाले मराठी माणसाला (अधिकार्याला) पुढे करतात. म्हणजे दोन मराठी माणसांनी भांडण करायचे का ? यांना सांगितले की, आम्ही सामन्यांचे मराठीत समालोचन करू. त्यानंतर त्यांनी लेखी पत्र दिले.’’
सध्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनीही ‘डिस्नी हॉटस्टार’ला या संदर्भात विनंती केल्याचे समजते.
संपादकीय भूमिका
|