
वर्धा, १९ एप्रिल (वार्ता.) – बंगालच्या मुर्शिदाबाद येथे झालेला हिंसाचार आणि हिंदूंच्या हत्या यांच्या विरोधात १९ एप्रिल या दिवशी वर्धा येथे सर्व सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यात यावे’, अशा मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सर्वश्री भाजपचे माजी खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, विश्व हिंदु परिषदेचे नेते अटल पांडे, शिवसेनेचे जिल्हा नेते तुषार देवढे, शिवसेनेचे उपजिल्हा नेते बालू कीर्तने यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जनआक्रोश मोर्चाला प्रारंभ झाला. वाहनफेरीच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाचा समारोप करण्यात आला.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन