वीजजोडणी तोडल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेना आक्रमक !
खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे.