बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर कार्यवाही करावी !

बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे न देण्याविषयी शासकीय निर्णय असतांना आर्थिक प्रलोभनासाठी कायद्याला हरताळ फासून बिअरबार आणि मद्यालये यांना देवता अन् महापुरुष यांची नावे दिली जात आहेत. नवीन मद्यालये अथवा बिअरबार चालू करण्यापूर्वी वा या दुकानांच्या परवान्यांचे…

महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागांवर विजय मिळवून राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमत मिळवेल !  अमित शाह

कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि जनतेचा विश्‍वास जिंकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागांवर विजय मिळवत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमत मिळवेल, असे ट्वीट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.

(म्हणे) ‘ईडीच्या भीतीपोटी शिवसेनेची भाजपसह युती !’

भाजपने अंमलबजावणी संचलनालयाची भीती घालून शिवसेनेला युती करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. युतीची घोषणा होण्याच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अमरावती येथील भाजपप्रणीत ‘राष्ट्रीय कृषी विकास परिषदे’त अश्‍लील नृत्य

वरूड येथे भाजपने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय कृषी विकास परिषदे’त निवृत्त नायब तहसीलदारांनी तोकड्या कपड्यातील नर्तिकेसमवेत अश्‍लील नृत्य केले. (नैतिक अधःपतन झालेल्या अशा शासकीय अधिकार्‍यांनी कारभार कसा केला असेल, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)

येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव करणे, ही ऐतिहासिक चूक ठरेल ! – मुख्यमंत्री

येणारी लोकसभा निवडणूक भाजपसाठी नाही, तर भारतासाठी आहे. लोकसभा निवडणुकीत खिचडी सरकार आले, तर देशाची काय अवस्था होईल ? वर्ष २००९ ते २०१४ या कालावधीतील निर्णय न घेणारे काँग्रेस सरकार परत आल्यास पुढील ५ नव्हे, तर ५० वर्षे याचे परिणाम सोसावे लागतील.

(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांचा दर्जा देणे, हा राज्यांतर्गतचा विषय !’

देशात मुस्लिम, बौद्ध, ख्रिस्ती, शीख, जैन यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्यात आला आहे. स्थानिक सूत्रांवरून तेथील राज्यशासन हा निर्णय घेत असते. केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाचा यामध्ये सहभाग नाही, असे सांगत केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्याच्या सूत्राला बगल दिली.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी आज त्याच पक्षापुढे निवडणुकीसाठी गुडघे टेकले !  पियुष गोयल, केंद्रीय रेल्वेमंत्री

शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी काय वक्तव्य केले होते, हे सर्वांनाच माहीत आहे; मात्र आज पक्षापुढे त्यांनी निवडणुकीसाठी गुडघे टेकले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अपयशी झाल्यामुळे आणि आता पुढे कुणीच नसल्याने त्यांनी प्रियांका गांधी यांना पुढे केले आहे.

भाजप सरकारच्या काळात मुसलमानांच्या तुलनेत हिंदूंच्या बेरोजगारीत वाढ

भाजप सरकारच्या गेल्या पावणेपाच वर्षांच्या सत्ताकाळात देशातील मुसलमानांच्या तुलनेत हिंदूंच्या बेरोजगारीत वाढ झाल्याची आकडेवारी राष्ट्रीय नमुना परीक्षण कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. याविषयीचे वृत्त ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

१६ व्या लोकसभेत ९१ वर्षीय लालकृष्ण अडवाणी आतापर्यंत केवळ ३६५ शब्दच बोलले !

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी १६ व्या लोकसभेतील खासदार आहेत. त्यांची लोकसभेतील उपस्थितीही ९१ टक्के इतकी आहे; मात्र त्यांनी या काळात केवळ ३६५ शब्दच उच्चारले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

भाजप लोकसभा निवडणुकीआधी देशभरात जातीय दंगली घडवू शकतो ! – उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर

२१ फेब्रुवारीला राममंदिराच्या नावे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भाजप सध्या दंगली घडवण्याच्या विचारात आहे. भाजपचे लोक मते मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, असा आरोप उत्तरप्रदेशातील भाजप सरकारमधील सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष आणि मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी भाजपवर केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF