राष्ट्राकडे पहाण्याचा सर्वपक्षीय शासनकर्त्यांचा अपूर्ण दृष्टीकोन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परिपूर्ण दृष्टीकोन !
‘आजचे सर्वपक्षीय शासनकर्ते राष्ट्राकडे केवळ स्थूल दृष्टीने ‘राष्ट्र’ म्हणून पहातात; म्हणून ते राष्ट्राचा भौतिकदृष्ट्या विकास, जनतेसाठी आधुनिक सोयीसुविधा इत्यादींच्या अनुषंगानेच विचार करतात. चराचरातील प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे स्थूल कारणासह सूक्ष्म कारणही असते.