आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन

वाईट शक्तींच्या त्रासांपासून समाज मुक्त व्हावा, यासाठी विविध आध्यात्मिक उपायांविषयी ग्रंथ प्रसिद्ध करणारे ‘सनातन संस्थेचे’ संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

लघुग्रंथाचे मनोगत

‘सर्वसाधारणपणे व्यक्तीला स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांनी जेवढे आकलन होते, तेवढेच ठाऊक असते. या सर्वांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. बहुतांशी व्यक्तींना सूक्ष्मातील ठाऊक नसते. त्यामुळे त्यांना ‘सूक्ष्म-जगतातील वाईट शक्ती, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह किंवा ग्रहांचे अशुभ योग’ यांच्यामुळे उद्भवणारे त्रास इत्यादी आध्यात्मिक त्रासांविषयी ठाऊक नसते. असे असले, तरी या आध्यात्मिक त्रासांमुळे व्यक्ती नाना प्रकारे पीडित होते. सध्याच्या कलियुगात तर वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. आज जवळजवळ प्रत्येकालाच अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास आहेच. त्यामुळे आध्यात्मिक त्रास दूर करण्याविषयीचे गांभीर्य प्रत्येकामध्येच निर्माण होणे आवश्यक बनले आहे.

आध्यात्मिक त्रासांचा परिणाम व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि जीवन यांवर कसा होतो, याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत – काही जणांचे आजार पुष्कळ औषधोपचार करूनही बरे होत नाहीत. काही जणांना सारखे अकारण गोंधळून जायला होते. काही जण सांसारिक अडचणींनी अती त्रस्त होतात. काही जणांना वारंवार अकारण नकारात्मकता किंवा निराशा येते आणि अती निराशेमुळे काहींच्या मनात ‘आता जीवनाचा अंत करूया’, असे टोकाचे विचारही येतात. काही साधकांकडून साधनेचे पुष्कळ प्रयत्न करूनही त्यांची साधना चांगली होत नाही.

बरेच साधक आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी नामजप इत्यादी ‘नामजपादी उपाय’ करतात; पण वाईट शक्ती ‘साधकांकडून नामजपादी उपाय परिणामकारक होऊ नयेत’, यासाठीही प्रयत्न करतात. त्यामुळे साधकांचे त्रास लवकर अल्प होत नसल्याने त्यांना हळूहळू उपायांमध्येही स्वारस्य वाटेनासे होते.

सनातनच्या ‘वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय’ या ग्रंथमालिकेचा थोडक्यात परिचय !

जीवनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक इत्यादी ८० टक्के समस्यांमागील मूळ कारण म्हणजे आध्यात्मिक त्रास ! ‘हे कारण दूर करण्यासाठी पारंपरिक नामजपादी उपाय कसे करायचे’, याविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन करणारी ‘वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय’ ही ग्रंथमालिका सिद्ध करण्यात आली आहे. या मालिकेतील ३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. नुकताच ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ हा लघुग्रंथ सर्वत्र वितरित झाला आहे. या लघुग्रंथाची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी त्याचे मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ दैनंदिन जीवनात उपयुक्त असल्याने वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. तसेच ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृती करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

ग्रंथांचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

‘आध्यात्मिक त्रास होणे’, हे जरी आपल्या हातात नसले, तरी ‘नामजपादी उपायांनी त्रास नियंत्रणात ठेवणे आणि हळूहळू ते संपुष्टात आणणे’, हे आपल्या हातात आहे. यासाठी त्रासांकडे पहाण्याची स्वतःची दृष्टी पालटावी लागते. ‘नामजपादी उपायांनी आपण त्रासांवर नक्की मात करू शकतो’, हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करावा लागतो. यासाठी सकारात्मक, संयम आणि उत्साह वाढवणारे, धैर्य आणि विजिगीषु वृत्ती निर्माण करणारे, तसेच उपाय परिणामकारक होण्यास साहाय्य करणारे, असे दृष्टीकोन मनावर सारखे बिंबवावे लागतात. प्रस्तुत लघुग्रंथामुळे हा उद्देश साध्य होण्यास साहाय्य होईल. लघुग्रंथात दिलेले दृष्टीकोन हे सनातनच्या साधकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले असल्याने त्यांमध्ये ‘साधक’, असा उल्लेख आहे. असे असले, तरी बहुतांशी दृष्टीकोन हे सर्वांनाच उपयोगी पडणारे आहेत.

‘या लघुग्रंथाच्या अभ्यासाने त्रास असलेल्यांना त्रासांवर मात करण्याची प्रेरणा आणि दिशा मिळो अन् त्यांच्याकडून चांगली साधना होऊन त्यांचे जीवन आनंदी बनो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ – संकलक

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी SanatanShop.com


संपर्क क्र. : ९३२२३ १५३१७

टीप : प्रस्तुत लेखाचे सर्वाधिकार (कॉपीराईट)‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.