१. पहिला टप्पा
‘ध्येयापैकी जे काही थोडेफार तरी साध्य झालेले असेल, त्याविषयी समाधान बाळगावे आणि गुरु किंवा ईश्वर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
२. दुसरा टप्पा
अपयशामागील कारणे शोधावीत. शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक यांपैकी नेमके कोणते कारण आहे, याचे चिंतन करावे. त्या कारणानुसार योग्य ती उपाययोजना करावी. यासंदर्भात आवश्यकता भासल्यास कुटुंबीय किंवा सहकारी यांचे साहाय्य घ्यावे.
३. तिसरा टप्पा
वरीलप्रमाणे करूनही अपयश आले, तर त्यातही आनंदच मानावा आणि असा विचार करावा, ‘आता देव आणखी पुढच्या टप्प्याचे प्रयत्न करायला शिकवेल.’ ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे, हे ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे; म्हणून प्रयत्न करणे सोडू नये.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (२३.३.२०२१)