गंभीर रुग्णाईत असतांनाही सदा आनंदी आणि साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची तळमळ असणारे पू. होनपकाका !
पू. होनपकाकांना आजारपणामुळे तीव्र वेदना आणि थकवा असायचा, तसेच रात्रभर झोप लागायची नाही. असे असतांनाही त्यांच्या मुखचर्येवर (चेहर्यावर) नेहमी आनंदच जाणवायचा. त्यांना कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नसायची. ही संतांची मोठी वैशिष्ट्ये त्यांच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवायची.