
‘गुरु किंवा ईश्वर यांच्या चरणी पूर्ण समर्पित झाल्यावर स्वतःविषयीचे विचार पुष्कळ अल्प होतात. आपण सतत ईश्वरी अनुसंधानात असलो, तर ईश्वराचेही आपल्याकडे लक्ष असते. गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना एखाद्या वेळी आपल्या संदर्भात काहीतरी प्रतिकूल जरी घडले, तरी ‘ते ईश्वरेच्छेनेच झाले आहे; म्हणून कल्याणकारकच आहे’, असा विचार मनात येतो. त्यामुळे प्रतिकूल घडल्याविषयी वाईट वाटत नाही. यावरून गुरुचरणांशी पूर्ण समर्पित असणे आणि सतत ईश्वरी अनुसंधानात रहाणे यांचे महत्त्वही लक्षात येते.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१०.११.२०२०)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !