मच्छिमार कल्याणकारी महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करा ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री
मासेमारांसाठी स्थापन करण्यात येत असलेले महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ या दोन्ही महामंडळांच्या स्थापना प्रक्रियेला गती द्यावी. मासेमारांच्या विविध समस्या या महामंडळांच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहेत.