ज्योतिष आणि वास्तू सल्लागार डॉ. गोपाळकृष्ण रत्नपारखी यांची रत्नशास्त्र कार्यशाळा !

जिज्ञासूंना नावनोंदणीचे आवाहन

नगर – येथील नामांकित ज्येष्ठ रत्न, ज्योतिष आणि वास्तू सल्लागार डॉ. गोपाळकृष्ण रत्नपारखी यांची रत्नशास्त्र कार्यशाळा २७ एप्रिल २०२५ या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रोफेसर चौकामधील हॉटेल रोज गोल्ड (ब्रह्मभोज) येथे आयोजित करण्यात आली आहे. ‘श्री सह्याद्री ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर’ आणि श्रीराम ज्योतिष कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत रत्नांचा उपयोग कसा होतो ? रत्नाचा भविष्याशी संबंध काय ? रत्न कुणी धारण करावे ? तसेच रत्नाचे आयुष्य, रत्नाचे प्रकार, रत्न परीक्षण, महारत्ने, माणिक, मोती, प्रवाळ, पुष्कराज, पाचू, हिरा, निलम, गोमेद, वैडुर्य (लसण्या), रत्नांच्या प्रजाती यांविषयी शास्त्रोक्त माहिती सप्रात्यक्षिक दिली जाणार असून लाखो रुपये किमतीचे रत्न प्रत्यक्ष निरीक्षणासाठी ठेवले जाणार आहेत.

या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या सर्वांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रवेश मर्यादित असून नाव नोंदणीसाठी आयोजक सौ. शीतल देशमुख (८९९९०९६५८७/९९६०६४४३४३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीराम ज्योतिष कार्यालयाने केले आहे.