प्रतिदिन बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करा !

जिल्हासेवकांना सूचना

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

​‘सध्याचे बाल आणि युवा साधक ही हिंदु राष्ट्राची भावी पिढी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. सध्या विदर्भातील बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा प्रतिदिन आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे ‘त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांना गती आली’, असे लक्षात आले. सर्वत्रच्या जिल्हासेवकांनी आपल्या जिल्ह्यातील बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा प्रतिदिन ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करावे. आढाव्याच्या संदर्भातील बारकावे पुढे दिले आहे.

१. बाल आणि युवा साधकांचे पुढीलप्रमाणे तीन वयोगटांत वर्गीकरण करावे.

अ. कुमार गट : वय ५ ते १० वर्षे, वय ११ ते १४ वर्षे

आ. किशोर गट : वय १५ ते १८ वर्षे

२. एका गटात अधिकाधिक ८ विद्यार्थी-साधक असावेत.

३. विद्यार्थी-साधक आणि आढावासेवक यांच्या संख्येनुसार गटाची रचना करावी.

४. चिंतनसारणीप्रमाणे आढावा घ्यावा.

५. विद्यार्थी-साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, तसेच त्यांना आलेल्या नाविन्यपूर्ण अनुभूती रामनाथी येथील संकलन विभागात पाठवाव्यात.

बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. संतांनी सांगितल्यानुसार भावी काळात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. हिंदु राष्ट्राची भावी पिढी घडवण्याची संधी मिळाल्याविषयी कृतज्ञता बाळगून स्वतःच्या साधनेच्या दृष्टीनेही त्याचा लाभ करून घ्या !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२०)

विद्यार्थी-साधकांना सूचना

विद्यार्थी-साधकांनो, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ज्याप्रमाणे शालेय अभ्यास आवश्यक असतो, त्याप्रमाणे जन्मोजन्मीच्या परीक्षेतून उत्तीर्ण होण्यासाठी व्यष्टी साधना आवश्यक असते. यासाठी व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे करा आणि त्या प्रयत्नांचा आढावा प्रतिदिन जिल्ह्याच्या अंतर्गत निश्‍चित केलेल्या साधकाला द्या ! आपल्या भागातील जिल्हासेवक तुम्हाला याचे नियोजन करून देतील. ‘एवढ्या लहान वयात व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची संधी मिळत आहे’, याविषयी कृतज्ञ रहा !

पालक साधकांना निवेदन

​आपल्या पाल्याला व्यष्टी आढाव्याला जोडून देणे, हे साधक-पालकांचे आध्यात्मिक दायित्व आहे. ‘आढाव्यात सांगितलेले प्रयत्न तो करत आहे ना ?’, याकडेही लक्ष देऊन आपल्या पाल्याला आध्यात्मिक साहाय्य करा !