‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा सप्टेंबर २०२० मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा

१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या (सप्टेंबर २०२०)

सद्गुरु सिरियाक वाले

२. संकेतस्थळावरील लेख जगातील ८ भाषांमध्ये !

​सप्टेंबर २०२० मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, इटालियन, व्हिएतनामी, चिनी, रशियन, इंडोनेशियन आणि स्पॅनिश या ८ भाषांमधील एकूण १९ लेख ठेवण्यात आले.

३. ‘ऑनलाईन’ प्रसार

अ. एस्.एस्.आर्.एफ्.चे ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या ६ जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.

आ. ३० सहस्रांहून अधिक लोकांनी ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

४. ‘लॉग-इन’ सुविधा

४ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये इंग्रजी, फ्रेंच, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश आणि इंडोनेशियन या ६ भाषांतील वाचकांच्या ६० प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या २ नवीन जिज्ञासूंनी नामजप आणि आध्यात्मिक उपाय चालू केले आहेत.

४ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : या अंतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये एकूण ६६ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. या मासात संपर्कात आलेल्या २ नवीन जिज्ञासूंनी नामजपादी उपाय चालू केले.

​या दोन्ही सुविधांच्या अंतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये एकूण १२६ प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली.

५. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)

​याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, सर्बो-क्रोएशियन, फ्रेंच आणि रशियन या ७ भाषांतील १ सहस्र ५८० वाचकांशी संवाद साधता आला.

६. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् त्यांना जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !

​सप्टेंबर २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन, क्रोएशियन अन् इंग्रजी या भाषांत; जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड येथे जर्मन भाषेत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, रशिया, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाइन’ ३९ व्याख्याने अन् १० कार्यशाळा घेण्यात आल्या. ३९ सहस्र २५० जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ६५ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.

​या व्यतिरिक्त जर्मन भाषेत २ ‘ऑफलाईन’ आणि बर्लिन येथे अर्ध्या दिवसाची एक कार्यशाळा घेण्यात आली.

७. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

८. एकूण १९२ देशांत ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देणारे वाचक आहेत.

श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (ऑक्टोबर २०२०)