मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान !

मुंबई – भाजप हा सरकारमधील पक्ष आहे. सरकारमधील पक्षाने दायित्वाने वागण्याची आवश्यकता आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिली माध्यमाची भाषा सक्तीची आहे. दुसरी मराठी भाषा सक्तीची आहे. तिसरी भाषा हिंदी अनिवार्य नाही. त्या त्या राज्याला भाषा निवडण्याचे स्वातंत्र दिले आहे. तिसरी भाषा निवडण्याचे स्वातंत्र आहे, मग हिंदीची सक्ती का ? भाषेच्या विषयाच्या संदर्भात आमच्या समवेत, तसेच भाषा समितीसमवेत चर्चा करा. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणता, मग सगळ्यांसोबत चर्चा करा. तुम्ही सरकारमध्ये आहात. हिंमत असेल, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून दाखवा आणि तेथे मराठी शाळा चालू करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात आहे’, असे मनसे पक्षाचे नाव न घेता म्हटले होते. त्याला मनसेने प्रत्युत्तर दिले.