‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा ऑगस्ट २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

१. संकेतस्थळासंबंधी संख्यात्मक आढावा

१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या (ऑगस्ट २०२१)

१ आ. ‘ऑनलाईन’ प्रसार : ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ आणि ‘पिंटरेस्ट’ यांची एकूण सदस्यसंख्या ३ लाख २५ सहस्र ३२७ असून १८ सहस्र ३६९ लोकांनी या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

सद्गुरु सिरियाक वाले

२. ‘लॉग-इन’ सुविधा

२ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये इंग्रजी, जर्मन, इंडोनेशियन, चिनी आणि स्पॅनिश या ५ भाषांतील वाचकांच्या ८४ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

२ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : ऑगस्ट २०२१ मध्ये एकूण ५६ प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

३. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)

याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन या ७ भाषांतील १ सहस्र ६७ वाचकांशी संवाद साधता आला.

४. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् जिज्ञासूंचा त्यांना मिळालेला प्रतिसाद !

अ. ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ‘ऑनलाईन’ ११ व्याख्याने अन् ३ कार्यशाळा घेण्यात आल्या. १ सहस्र ३०० जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर २४ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.

आ. ऑगस्ट २०२१ मध्ये सर्बिया येथील झिरेन्यानीन या शहरात सर्बियन भाषेत ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर एक प्रवचन करण्यात आले.

इ. ऑगस्ट २०२१ मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी २३ ‘ऑनलाईन’ नामजप सत्रे घेतली. यांचा एकूण ५ सहस्र १८ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.

ई. एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ६.८.२०२१ या दिवशी किशोरवयीन मुलांसाठी ‘अधिकाधिक चांगली स्पंदने आणूया (लेटस् ब्रिंग मोअर पॉझिटिव्हिटी)’ या विषयावर ‘ऑनलाईन’ सत्संग घेण्यात आला. १८७ जणांनी या सत्संगाचा लाभ घेतला.

५. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (सप्टेंबर २०२१)