बेताळभाटी समुद्रकिनार्‍यावर भटक्या कुत्र्याचे रशियाच्या मुलीवर आक्रमण

६ वर्षांची मुलगी गंभीररित्या घायाळ

प्रतिकात्मक चित्र

मडगाव, २१ एप्रिल (वार्ता.) – फोंडा येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात दीड वर्षाच्या अनाबिया शेख या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच बेताळभाटी समुद्रकिनार्‍यावर खेळणार्‍या एका ६ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याने आक्रमण केले आणि यामध्ये ती गंभीररित्या घायाळ झाली.

दक्षिण गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी सरकार आणि अशासकीय संस्था शर्थीचे प्रयत्न करत असले, तरी ही समस्या अजूनही सुटलेली नाही. बेताळभाटी समुद्रकिनार्‍यावर पालकांसमवेत खेळत असलेल्या ६ वर्षांच्या रशियाच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने आक्रमण केले आणि त्यात ती गंभीररित्या घायाळ झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जीवरक्षकाने मुलीवर प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर मुलीला तिच्या पालकांनी वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरकडे नेले.

संपादकीय भूमिका :

  • प्राणीप्रेमींकडे यावर कोणतीही उपाययोजना नाही का ?
  • ठिकठिकाणी सिद्ध होणारे कचर्‍याचे ढिगारे हेही भटक्या कुत्र्यांच्या निर्मितीचे कारण आहे. ही कचर्‍याची समस्या सोडवली, तरी भटक्या कुत्र्यांच्या समस्येत थोडी घट होईल !