सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ११ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. २३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत हे महोत्सव पार पडले. या महोत्सवांना भारतभरातील जिज्ञासूकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचा संख्यात्मक आढावा येथे दिला आहे.

एकूण दर्शकसंख्या : १ लाख २४ सहस्रांहून अधिक

सनातन आणि समिती यांच्या ‘यू ट्यूब चॅनल्स’चे वाढलेले ‘सबस्क्राईबर्स’ (वर्गणीदार) : साधारण २ सहस्र ५००

एकूण अभिप्रायांची संख्या : १ सहस्र ४३०

कोणत्या देशांतून महोत्सव पाहिले गेले : भारत, अमेरिका, युनायटेड किंगडम, मलेशिया आदी.