अंबरनाथ येथे बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दुपारी अडीच वाजता गोळीबार !

प्रतिकात्मक छायाचित्र

अंबरनाथ – येथील विश्वनाथ पनवेलकर या बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार करणारे दुचाकीवरून आले होते. त्यांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या आणि ते घटनास्थळावरून फरार झाले. दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. हा प्रकार पनवेलकर यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत झाली आहे.