
कोल्हापूर – भाजपचे येथील ज्येष्ठ नेते विजय उपाख्य बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६ वर्षे) यांचे अल्पशः आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कळंबा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘सकाळ’चे बातमीदार प्रवीण देसाई यांचे ते वडील आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बाबा देसाई हे भाजपच्या कोल्हापूर येथील स्थापनेपासूनचे सक्रीय कार्यकर्ते होते. ते भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, तसेच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री होते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर ते कायम निमंत्रित सदस्य होते. ‘गोकुळ’चे माजी संचालकही होते. ‘शाहू मिल’मध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली होती.