
पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी केलेल्या वक्तव्यात आणि आजच्या वक्तव्यात तफावत आहे, ही गोष्ट दुर्दैवी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रकरणामध्ये अद्यापही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. त्याविषयी आम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊ, असे शरद पवार गटाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.