ऑनलाईन सत्संग ऐकणार्‍या ठाणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

ठाणे येथील जिज्ञासूंना ऑनलाईन नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही जणांचे अभिप्राय २३ जानेवारी या दिवशी पाहिले. आज उर्वरित भाग पुढे देत आहोत.


भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443912.html

१८. एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या सत्संगातील जिज्ञासूंचे मनोगत

१८ अ. सौ. सोनाली भारंबे

१. सद्गुरु सिरियाकदादा यांचे रविवारी ऑनलाईन नामजप सत्संगात मार्गदर्शन झाले. त्यांनी पुष्कळ उपयुक्त माहिती सांगितली. आम्ही सत्संगात सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन स्वयंसूचना देतो आणि श्रीकृष्ण अन् कुलदेवता यांचा नामजप करतो, तसेच सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपही नियमितपणे करतो.

२. सत्संगात सद्गुरु सिरियाकदादा इतरांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत असतांना मला माझ्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे मिळत होती.

३. माझ्या मनात कोरोनाच्या संकटाविषयी असलेली भीती आणि अस्वस्थता सद्गुरु सिरियाकदादांच्या मार्गदर्शनामुळे दूर झाली.

४. आता आम्ही सर्व जण प्रत्येक काम करतांना प्रथम प्रार्थना करतो.

५. माझे वडील श्री. भगवान महाजन यांनी हा सत्संग प्रथमच ऐकला. त्यांना तो पुष्कळ आवडला. आता ते प्रतिदिन कुलदेवतेचे नामस्मरण करतात.

या सत्संगासाठी सद्गुरु सिरियाकदादा आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

१८ आ. श्री. अजय भारंबे

१८ आ १. सद्गुरु सिरियाकदादांनी कोरोना विषाणूंशी कसे लढायचे ?, हे शिकवणे : सत्संगात पुष्कळ छान माहिती मिळाली. सद्गुरु सिरियाकदादांनी भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोरोना विषाणूंशी कसे लढायचे ?, हे सांगितले. त्यांनी सांगितलेला नामजप आणि प्रार्थना यांतील शक्तीही मी अनुभवली. आम्ही घरातील सर्व जण प्रतिदिन सद्गुरु सिरियाकदादांनी सांगितलेला नामजप एक माळ करतो आणि नेहमीचा नामजपही करतो.

१८ आ २. सद्गुरु सिरियाकदादांना मनातले प्रश्‍न आधीच कळत असणे आणि सत्संगात त्यांनी त्या प्रश्‍नांचे निरसन करणे : दळणवळण बंदीच्या काळात सनातन संस्थेच्या ऑनलाईन सत्संगांचा पुष्कळ लाभ होत आहे. सद्गुरु सिरियाकदादा एकेका विषयाचे सखोल विश्‍लेषण करून समजावून सांगत असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करतो. माझ्या मनात असणारे प्रश्‍न सद्गुरु सिरियाकदादांना आधीच कळतात. ते सत्संगात त्या प्रश्‍नांचे निरसनही करतात. मी माझ्यामध्ये भाव आणि भक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

१८ आ ३. आम्ही ओळखीच्या जिज्ञासूंना नामजप करण्यास जागृत आणि प्रवृत्त केले आहे.

१८ आ ४. दुपारी आणि संध्याकाळी होणार्‍या सत्संगांतून धर्माविषयीची महत्त्वाची माहिती मिळते आणि त्याचे महत्त्व लक्षात येते.

सद्गुरु सिरियाकदादा आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

(समाप्त)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक