
आगरा (उत्तरप्रदेश) – वर्ष २०२१ मध्ये पत्नी वर्षा रघुवंशी हिचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फईम कुरेशी याला १० वर्षांची कठोर शिक्षा सुनावली. फईम याला हुंडाबळी आणि क्रूरतेसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ ब आणि ४९८ अ यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
१. या प्रकरणात फईम याचे वडील कयूम कुरेशी, आई फिरदौस कुरेशी, भाऊ नईम कुरेशी आणि बहीण तबस्सुम कुरेशी यांंना या गुन्ह्याशी थेट जोडणारे पुरेसे पुरावे नसल्याने निर्दोष मुक्त करण्यात आले.
२. वर्षा यांना केवळ हुंड्यासाठी छळण्यात आले असे नाही, तर त्यांचे धर्मांतर करण्यासाठीही छळ करण्यात आला, असा युक्तीवाद सरकारी अधिवक्त्यांनी केला; मात्र याचे ठोस पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
१२ नोव्हेंबर २०२१ या दिवशी वर्षा तिच्या सासरी मृतावस्थेत आढळली. तिच्या माहेरच्या लोकांनी ‘वर्षा हिच्या सासरच्या लोकांनी वारंवार हुंड्याची मागणी केल्यामुळे तिला अनेक महिने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. त्यांनी हुंड्यासाठी ५ लाख रुपये आणि चारचाकी गाडी यांची मागणी केली. मागण्या पूर्ण न केल्याने तिचा छळ करण्यात आला. तिच्या सासरच्यांनी तिला हिंदु धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, तसेच तिला मांस शिजवण्यास आणि खाण्यास भाग पाडले गेले’, असे तक्रारीत म्हटले होते. सुनावणीच्या वेळी साक्षीदारांनी सांगितले की, वर्षा पूजा करत असल्याने तिची थट्टा करण्यात आली आणि ती हिंदु परंपरा पाळत असल्याने तिचा अपमान करण्यात आला. जर तिने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, तर तिला जीव गमवावा लागेल. ‘वर्षा यांची हत्या करण्यात आली आणि नंतर ती आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी त्यांना फाशी देण्यात आली’, असेही वर्षाच्या कुटुंबियांचे म्हणणे होते.
संपादकीय भूमिकाधर्मांधांशी विवाह करणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, हे हिंदु युवतींच्या आतातरी लक्षात येईल का ? |